
मुंबई- मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करू नये या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी आज दुपारी ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत मुंबई बैठक होणार आहे.
सरकारने ओबीसी समाजाच्या आंदोलनाची दखल घेऊन आज बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महत्त्वाचे ओबीसी नेते आणि मोठ्या संख्येने ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत राहणार आहेत. या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन तोडगा निघेल, असा विश्वास भाजप नेते परिणय फुके यांनी व्यक्त केला आहे. मागील दोन आठवड्यांपासून ओबीसी समाजाचे आंदोलन सुरु आहे. त्याची दखल घेऊन सरकारने हे पाऊल उचलले आहे.