पुनवर्सन मंत्र्यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी,पॅकेज देणार

0

 

नागपूर- नागपुरात शनिवारी जवळपास ढगफुटी झाली, यासंदर्भात नुकसान भरपाईसाठी मदत व पुनर्वसन खात्याकडून काय मदत केली जाऊ शकते याचा आढावा आज मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी घेतला. नागपुरात विविध पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
मदत पुनर्वसन विभागाला केंद्र सरकारकडून मदत लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जवळपास १० किमी नाग नदीवरील सुरक्षा भिंत तुटली आहे. यासाठी राज्य सरकराकडून तात्काळ मदत मिळेल. डिसेंबरच्या अधिवेशनात ग्रामीण भाग आणि शहरासाठी नागपूर जिल्ह्यासाठी एकत्र पॅकेज जाहीर करण्याचे नियोजन आहे. एकंदर १२५०० हजार लोकांचे नुकसान झाल आहे. त्यांचे पंचनामे झाले. पंचनामे २ तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आहेत. तीन तारखेपासून १० हजार रुपयांच्या मदतीचं वाटप केले जाणार आहे. मदतीसाठी कुणीही दलालांच्या भूलथापांना बळी पडू नका, पैसे मागणाऱ्या दलालांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. श्रीमंत व्यक्तिंना १० हजार मदत कमीच आहे. पण पंचनामे झाल्यास त्यांचा डेटा सरकरकडे राहील. पंचनाम्यात कागदपत्र झालेलं नुकसान रेकॅार्डवर राहील. नाग नदीवर अंबाझरी तलावापासून १० किमी पर्यंत पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होईल असे पूल किंवा इतर बांधकाम तोडणे गरजेचं आहे. याबाबतीत मनपा १० दिवसांत रिपोर्ट सादर करणार असून संरक्षण भिंत बांधण्याबाबत कार्यवाही केली जाईल. दरम्यान, मदत व पुनर्वसन विभाग आणि सिंचन विभागाकडून अंबाझरी तलावाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केली आहे. मदतीसाठी देखील मला फडणवीस यांनी सुचना दिल्या आहेत. नागपूरसाठी खास पॅकेज कसं तयार करायचं? यासाठी मी आलो आहे. नागपुरात १०९ मिमी पाऊस झाला म्हणून नुकसान झालं असं म्हणण्याचं कारण नाही. मदत आणि पुनर्वसन विभागाकडून एक सॅटेलाईट लाँच करण्याचा प्रयत्न करतोय. ज्याद्वारे ढगफुटी, वादळ, अतिवृष्टी, भूगर्भातील हालचाली याची माहिती मिळणार. यासाठी आमचा विभाग एक ॲडव्हान्स पाऊस उचलणार आहे. देशातला हा पहिला प्रयोग असणार आहे. एकीकडे शहरं सुंदर हवी. पण भविष्याचा विचार करुन विकासांचा प्लॅन करावा लागेल. दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून माहिती घेईल की नुकसान किती झालं. नागपूरकरांचं नुकसान होऊ देणार नाही असा विश्वास अनिल पाटील यांनी बोलून दाखविला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा