खलिस्तानी दहशतवाद्याची हल्ल्याची धमकी

0

अहमदाबाद- खलिस्तानवादी दहशतवादी गुरपतवंत पन्नू याने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट सामन्यावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. निज्जरच्या हत्येसाठी पंतप्रधान मोदी जबाबदार असून शिख फॉर जस्टिस या हत्येचा बदला घेणार असल्याचे दहशतवादी पन्नूने प्री रेकॉर्डेड मेसेज व्हिडिओमध्ये म्हटले होते. 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणार्‍या विश्वचषकाचे सामने आमचे लक्ष्य असतील, अशी धमकी त्याने दिल्यावर अहमदाबाद येथील सायबर क्राईम विभागाने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याआधीही पन्नूने १५ ऑगस्टला आणि जी-२० शिखर परिषदेत गोंधळ घालण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी काही लोकांना अटकही केली होती. 5 ऑक्टोबरला अहमदाबादच्या मोदी स्टेडियमपासून भारतात वर्ल्ड क्रिकेट कपला सुरुवात होणार नाही. वर्ल्ड टेरर कपची ही सुरुवात असेल. सिख फॉर जस्टिस खलिस्तानचा झेंडा घेऊन अहमदाबादवर हल्ला करणार आहे. निज्जर हत्याकांडाचा बदला आम्ही घेणार आहोत, असा त्याने दावा केलाय.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा