मुसळधार पाऊस

0

 

बुलढाणा- बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने येथील नदीला पूर आला आहे. या नदीवर असलेल्या पुलावरून पाणी जात असल्याने बराच वेळ वाहतूक खोळंबली होती. पौर्णिमेनिमित्त सैलानी येथे भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, सैलानी-बुलढाणा मार्गावरील रायपूर येथील नदीला पूर आल्याने भाविक नदीकाठी अडकले. यावेळी वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. काही वेळानंतर पूर ओसरल्यावर वाहतूक सुरू झाली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा