कृषीमंत्री धनंजय मुंडे नागपूर दौ-यावर

0
-जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची करणार पाहणी
नागपूर – राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे आज रविवारी रात्री नागपुरात आगमन होणार आहे. उद्या सकाळी अकरा वाजेपासून ते जिल्ह्यातील विविध तालुक्यांना भेटी देत अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
1 ऑक्टोबर रोजी रात्री 11.35 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन व रवी भवन येथे मुक्काम. दि. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेपासून जिल्ह्यातील अड्याळी व उमरगाव (नागपूर तालुका), पाचगाव, चांपा व गावसुत (उमरेड तालुका), चाफेगडी, मोहगाव, चिचघाट (कुही तालुका) वडना, मोहखेडी व पावडदवना (मौदा तालुका) या अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी. रात्री 8.35 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावरून मुंबईकडे प्रस्थान.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा