चंद्रपूर : गोसीखुर्द कालव्यात तीन युवक बुडाले

0

 

चंद्रपूर : जिल्ह्यातील सावली येथे गणेश विसर्जनादरम्यान गोसीखुर्द कालव्याच्या पाण्यात गुरुदास मोहुर्ले, निकेश गुंडावार आणि संदीप गुंडावार हे तीन युवक बुडाले. बेपत्ता तरुणांचा शोध सुरू आहे. हा अपघात शनिवारी रात्री झाला. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. सावली तालुक्यात गणेश विसर्जनासाठी शनिवार ३० सप्टेंबर ही तारीख जिल्हा प्रशासनाने निश्चित केली होती. सावलीमध्ये एकूण ३ सार्वजनिक गणेश मंडळे होती, त्यापैकी २ मंडळांनी गावाजवळ असलेल्या तलावात विसर्जन केले तर एका गणेश मंडळाने गावाजवळून जाणाऱ्या गोसीखुर्दच्या कालव्यात विसर्जन करण्याचा निर्णय घेतला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा