राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट नाही – सुप्रिया सुळे

0

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे प्रश्न समजून घेऊन लढण्याचा प्रयत्न करत असतो. त्या माध्यमातून लोकांशी 365 दिवस संवाद साधत असतो. माझे बरेच दिवस या भागात येणं झालं नाही म्हणून मी नागपूर वर्धा आणि अमरावतीचा दौरा करीत आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आमची लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे. लोकांना भेटण्याची ती आम्ही पार पाडतो. तीन दिवस विदर्भ दौऱ्यावर आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
वाघनखावरून राजकारण सूरु आहे. मुळात महाराष्ट्र आणि देशासमोर महागाई, बेरोजगारी ही मोठी आव्हाने आहेत. एलपीजीचे भाव वाढले आहेत. पावसामुळे प्रचंड नुकसान झालं, महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. हे सगळे प्रश्न असताना इतिहासकार ज्याप्रमाणे म्हणतात, त्याप्रमाणे ते तज्ञ आहेत. त्यांनी वाघनखं संदर्भात आपले विचार व्यक्त करायला पाहिजे.
ज चव्हाण सूरज चव्हाण-इलेक्शन कमिशनचे अध्यक्ष आहेत का? त्यांच्याबद्दल माझ्या ऐकण्यातही नाही आलं आणि वाचण्यातही आलं नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट नाही. राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार, हे देशातील लहान मुलांना सुद्धा माहित आहे. ही पार्टी शरद पवारांनी बनवली आहे. तर मग चिन्ह इकडे तिकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही असेही स्पष्ट केले. माझी रणनीती मी तुम्हाला कशी सांगणार? चर्चा झाल्यावर बघू. अमरावतीला कोण उमेदवार असणार ते. भाजपच्या विरोधात बोललं की, त्याला आईस केला जातो. आईस म्हणजे इन्कम टॅक्स ईडी सीबीआय. यात काही नवल वाटत नाही. तिकडे गेले की स्वच्छ होऊन जातात.
मराठा लोकांना ओबीसी प्रमाणपत्र संदर्भात वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपाबाबत छेडले असता, सरकारी नोकरीमध्ये किती संख्या आहे, हे मला माहित नाही. राज्यात ट्रिपल इंजिन सरकार आहे. त्यांनी त्यावर उत्तर दिलं पाहिजे. आकडेवारी जी आली ती कोणी आणली. शेवटी डेटा हा सरकारकडे असतो. आरटीआयच्या माध्यमातून त्याची माहिती मागवता येईल. मात्र, आरटीआय चे उत्तर सुद्धा सरकार देत नाही.
शेतकरी प्रश्नी सरकार असंवेदनशील आहे. कांद्याची एवढी मोठी दिल्लीत काल मीटिंग झाली, त्यामध्ये किती मंत्री गेले? एवढा मोठा कांद्याचा विषय असताना, शेतकरी संकटात असताना, यांचा चुकीचे धोरण कांद्याचा प्रश्न गंभीर आहे. हे मी चार महिने आधी ट्विट करून पियुष गोयल यांना सांगितलं होतं. जगात कांदा कमी आहे, तिकडे जाऊ द्या, असे मी सांगितलं होतं. शेतकऱ्यांना चार पैसे मिळत होते, तेही यांना चांगलं दिसलं नाही. टोमॅटोला दोन पैसे मिळत असताना चुकीचे धोरण स्वीकारले. शेतकऱ्यांच कंबरडे मोडण्याचे पाप जर कोणी करत असेल तर हे सरकार करत आहे. यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही, पक्ष फोड, नेते फोड यातच त्यांचा वेळ जात असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा