“नकली वाघ का बिथरले?..”: भाजपची आदित्यवर टीका

0

मुंबई MUMBAI -वाघनखांच्या मुद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आदित्य ठाकरेंचा भाजपने समाचार घेतला. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार Ashish Shelar यांनी आपल्या ‘एक्स’ अकाउंटवर आदित्य ठाकरे यांना उत्तर दिले. “वाघनखे येणार कळताच, इथले नकली वाघ का बिथरले? छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारे, आता वाघनखांचेही पुरावे मागू लागले? आम्हाला शिवकालीन जे जे सापडेल ते ते सारे प्रिय छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती सुद्धा आम्हास वंदनीय..” या शब्दात शेलार यांनी समाचार घेतला आहे.

लंडनहून वाघनखे आणण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सामजस्य करार करण्यासाठी लंडनला रवाना झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या मुद्यावर सरकारवर निशाणा साधला आहे. “व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातील सदर वाघनखे तीन वर्षांसाठी उसनावारी देण्याचं मान्य केलं आहे. मग, हे कर्जावर आहे की परतावा आहे? परतावा असेल, शिवाजी महाराज यांचं मंदिर व्हावं आणि त्यात वाघनखे ठेवण्यात यावी. पण, ही वाघनखे शिवकालीन की शिवाजी महाराज यांनी वापरलेली आहेत?” असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत. त्याला शेलार यांनी प्रत्युत्तर दिले. शेलार म्हणाले, औरंगजेबी वृत्ती मात्र डोकं वर काढतेय? महाराजांच्या पराक्रमाचेच इथेही पुरावे मागतेय? आदू बाळाने शाळेतील पुस्तक सोडून अन्य काही वाचलेय का? यांना वाघ नख टोचतात आणि पेंग्विन घेऊन हे गावभर नाचतात?, असेही शेलार म्हणाले

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा