काँग्रेसने ओबीसी समाजाची दिशाभूलच केली- बावनकुळे

0

-भाजपच्या ओबीसी जागर यात्रेचा हिंगणघाट येथून थाटात शुभारंभ, उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर NAGPUR  -काँग्रेसने ओबीसी OBC समाजाला काहीही दिले नाही.दिशाभूल केली, जनतेला विकास देता येत नसेल तर त्यांना संभ्रमात ठेवणे हेच काम काँग्रेसने केले. आज चांद्रयान, आदित्य मुळे जगभरात भारताचा मान वाढला आहे. ओबीसी प्रधानमंत्री मोदीजी आज विश्वगौरव, युगपुरुष ठरले आहेत. खासदार रामदास तडस आणि आमदार समीर कुणावार यांना पर्यायाने भाजपला BJP  संधी दिल्यामुळेच आज 2029 साली संसदेत 190 महिला खासदार आणि विधानसभेत 90 महिला आमदार होणार आहेत.

मोदी यांच्या पुढाकाराने, महिला आरक्षणामुळे हे सहज शक्य झाले आहे असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. भाजपच्या ओबीसी जागर यात्रेचा आज वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील पारडी येथून शुभारंभ झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार प्रामुख्याने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजनसरा येथे संत भोजाजी महाराज यांचे दर्शन घेतले.

यावेळी त्यांनी ओबीसी समाजासाठी राज्य सरकारने ज्या काही योजना तयार केल्या त्याची जनजागृती व्हावी,खऱ्या अर्थाने लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ पोहोचावा, त्याची माहिती मिळावी हा या यात्रेचा उद्देश असून आज भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत सुरुवात होत आहे तर वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे माझ्या उपस्थितीत समारोप होणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली.

पार्डी ते पोहरादेवी ही भाजपची ओबीसी जागर यात्रा असून यासाठी माजी आमदार प्रदेश प्रभारी भाजप ओबीसी मोर्चा डॉ आशिष देशमुख,भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते, पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख डॉ रवींद्र येनुरकर प्रदेश संपर्क प्रमुख रवींद्र चव्हाण आदी मान्यवरांनी पुढाकार घेतला. सकाळी बापूकुटी सेवाग्राम येथे देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन केले. त्यानंतर नगाजी महाराज यांच्या कर्मभूमीला वंदन केले. पारडी, हिंगणघाट दर्शन त्यानंतर यात्रेची सुरुवात झाली. भाजप युवा मोर्चाचे पुढाकाराने अंकुश ठाकूर,किशोर दिघे यांच्या नेतृत्वाखाली मोटारसायकल, सायकल रॅली काढण्यात आली. मोठ्या संख्येने महिला देखील सहभागी झाल्या. आज देवळी, कळंबमार्गे यवतमाळ येथे या यात्रेचा मुक्काम असणार आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा