लेझर लाईट्समुळे डोळे गमावण्याची पाळी?

0

नाशिक-यंदाच्या गणेशोत्सवात डीजेच्या दणदणाटामुळे दोन युवकांचा मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या असतानाच आता लेझर लाइटच्या झगमगाटामुळे अनेकांच्या डोळ्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर दृष्टी गमावण्याची पाळी येण्याची भीती व्यक्त होत आहे. यात नाशिकमधील सहा जणांचा समावेश असून इतर ठिकाणीही लेझरमुळे डोळ्यांना दुखापत झाल्याच्या घटना उघडकीस येत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये अनेक वर्ष गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे लावण्यास मनाई होती. मात्र, यंदा आठ वर्षानंतर नाशिकमध्ये डीजे लावण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे या मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटावर तरुण बेभान नाचले. या मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. हे लेझर लाईट थेट डोळ्यांत गेल्याने सहा तरुणांवर आपली दृष्टी गमवावी लागल्याचे संकट निर्माण झाले आहे. सर्वच तरुण पंचवीशीच्या आतील आहेत. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, लेझर लाइटच्या थेट संपर्कात आल्यावर आधी या तरुणांची दृष्टी अंधूक झाल्याचे लक्षात आले. डोळ चुरचुरायला लागल्याने तरुणांनी डोळे चोळले असता त्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असता नेत्ररोग तज्ज्ञांनी काहींच्या डोळ्यांमध्ये काळे डाग निर्माण झाल्याचे सांगितले. डोळ्यांवर भाजल्यासारख्या जखमा आढळून आल्या. सुरुवातीला डॉक्टरांना या मागील कारण कळु शकले नव्हते. मात्र, त्यांची विचारपूस केल्यावर गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत लेझर लाइटचा त्रास झाल्याचे सांगितले. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या तरुणांना आता कायमस्वरुपी आपली डोळा गमवावा लागण्याची भीती आहे. सध्या सर्व तरुण निरीक्षणाखाली आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा