संजय राऊत माध्यमांसाठी करमणुकीचं साधन – धनंजय मुंडे

0

 

नागपूर  NAGPUR – शेतकरी सध्या संकटात आहे अशावेळी उद्याच्या कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांचे मोझॅक अळीमुळे जे नुकसान झाले त्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मदत देण्यावर शासन निर्णय घेणार आहे. SDRF, NDRF  एसडीआरएफ, एनडीआरएफ व पीक विमा या तिहेरी मानकावर मदत केली जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. dhananjay munde 

नागपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर आलेले मुंडे बोलत होते.2021-22 च्या नुकसान भरपाईची जी शासकीय मदत प्रलंबित आहे, ते शेतकऱ्यांना लवकरच हस्तांतरित केले जाईल.

पीक विमा संदर्भात बोलताना 1 रुपया पीक विम्यातून जेथे शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व दुष्काळामुळे नुकसान झाले, त्यांना पीक विम्यातून अंतरिम 25 टक्के मदत ही पीक विमा कंपनी कडून दिली जाणार आहे. पुढच्या पाच ते सहा महिन्यानंतर संपूर्ण राज्यात ई पंचनामे प्रक्रिया राबवली जाईल. अतिवृष्टी असो कि नैसर्गिक आपत्ती सर्वांसाठी राज्यात ई पंचनामे उपयुक्त ठरतील असा विश्वास बोलून दाखविला.
संजय राऊत यांच्या टिकाकडे लक्ष वेधले असता कुठल्याही मुद्द्यावर गंभीर नसलेले राऊत माध्यमांसाठी करमणुकीचं साधन आहे. सकाळी 9 वाजता संजय राऊतांचे तेच तेच आरोप करणे व आम्ही त्याचे उत्तर द्यावे याचा आता आम्हालाच कंटाळा आला आहे. कापसाच्या व सोयाबीन उत्पादन खर्चाच्या 50 टक्के भाव शेतकऱ्यांना देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा