संजय राऊतांच्या नावाचा वापर करुन कोव्हीड सेंटर मिळवलं-ईडी

0

मुंबई : मुंबईत जंबो कोव्हीड सेंटर घोटाळ्यात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात महत्वाचा गौप्यस्फोट करण्यात आलाय. (Jumbo Covid Center Scam in Mumbai) आरोपी सुजीत पाटकर याने महामारीच्या काळात अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या भेटीसाठी मित्र व शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ओळख वापरल्याचा आरोप ईडीने आरोपपत्रात केला आहे. पाटकर यांनी वरळी आणि दहिसर कोव्हीड जंबो रुग्णालयाच्या निविदा चर्चेसंदर्भात पाटकर यांनी जयस्वाल यांची भेट घेतली होती.

ईडीने म्हटले आहे की, पाटकर यांनी नवी कंपनी स्थापन करण्यापूर्वी लाइफलाइन हॉस्पिटलचे लेटरहेड जयस्वाल यांना देण्यास वापरले. पाटकर यांनी संजय राऊत यांच्या नावाचा वापर करून टेंडर मिळवले होते. यासाठी जयस्वाल यांनी पाटकरांना मदत केली. पाटकर आपल्या राजकीय संपर्काचा वापर करून निविदा प्रक्रियेची पूर्वमाहिती मिळवत होता. पाटकर यांच्या कंपनीने ६० टक्के कमी कर्मचारी पुरवले होते. तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या आरोग्याशी तडजोड करुन जास्तीची देयके बीएमसीला पाठवली होती. इतकेच नाही तर कोरोना बाधित रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड 19 उपचार केंद्राला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला होता. या चक्रीवादळाच्या वेळी केंद्रातील सर्व रुग्णांना एका दिवसासाठी इतर रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्या दिवशीची देयके देखील पाठविली गेली होती. डॉ.किशोर बिसुरे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे हा मुद्दा मांडूनही कारवाई झाली नाही. केवळ ३१ लाखांचा दंड ठोठावण्यात आला, असा दावा ईडीने केलाय.

ईडीच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आलेय की, खासदार संजय राऊत यांच्या नावाचा वापर करून ३२ कोटी ६० लाखांचे कंत्राट मिळविण्यात आले व त्याविषयी संजय राऊतांना पूर्ण माहिती होते. स्वतः पाटकर यांनी चौकशीत या संदर्भात खुलासा केल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा