अभिनेता रणबीर कपूर ईडीच्या रडारवर!

0

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर ईडीच्या रडारवर आला आहे. त्याला महादेव अॅप प्रकरणात ईडीने समन्स बजावले असून ६ ऑक्टोबरला त्याला ईडीसमोर हजर रहावे लागणार आहे.(Actor Ranbir Kapoor summoned by ED) रणबीर कपूर सह या प्रकरणात किमान डझनभर कलाकारांनाही ईडीने समन्स बजावले आहे. मात्र, त्यांची नावे स्पष्ट झालेले नाही. हे प्रकरण ऑनलाइन गेमिंगशी संबंधित आहे. ऑनलाइन गेमिंग अ‌ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरने हवालाद्वारे कलाकारांना पैसे दिल्याचा आरोप आहे. Actor Ranbir Kapoor on ED’s रणबीर कपूर या अ‌ॅपचे प्रमोशन करत होता. त्याला मोठी रक्कम रोख स्वरूपात मिळाल्याचा ईडीचा दावा आहे. ईडी ऑनलाइन गेमच्या जाहिरातींद्वारे निधीची देखील चौकशी करणार आहे. महादेव ऍपचे संस्थापक अशाप्रकारचे 4 ते 5 समान अँप्स चालवत आहेत. हे एप्स युएईमधून चालवले जातात. या अँप्सचे कॉल सेंटर्स श्रीलंका, नेपाळ, यूएईमध्ये असल्याचं सांगण्यात आले आहे. ईडीने यापूर्वी ‘महादेव’ बेटिंग अ‍ॅप केस संदर्भात रायपूर, भोपाळ, मुंबई आणि कोलकाता यासह एकूण ३९ ठिकाणी छापे टाकले होते. महादेव अॅपचा सर्वेसर्वा सौरभ चंद्राकर याच्याकडून आतापर्यंत ४१७ कोटी रुपयांची अवैध मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. सौरभ चंद्राकरच्या रॉयल वेडींगला अनेक सेलिब्रीटींनी हजेरी लावली होती. ते सर्व ईडीच्या रडारवर येतील, असे बोलले जात आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा