
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पालमंत्रिपदाची यादी जाहीर
- अजित पवार यांच्या ७ मंत्र्यांना पालकमंत्रिपदाची जबाबदारी
- खुद्द अजितदादांकडे पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी
मुंबई MUMBAI : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे EKNATH SHINDE यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार चंद्रकांत पाटील CHNDRAKANT PATIL यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून उचलबांगडी करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. त्याशिवाय कोल्हापूरचं पालकमंत्रिपद हसन मुश्रीफ आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद धनंजय मुंडे यांच्यकडे देण्यात आलेले आहे. त्याचवेळी नाशिक, सातारा आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाविषयीचा तिढा अद्याप कायम आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश झाल्यानंतर सरकारमध्ये पालकमंत्रिपदावरून काहीसा वाद उद्भवला होता. त्यामुळे पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली नव्हती.ही यादी निश्चित करण्यात आल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी सायंकाळी दिल्लीस गेले. याच दिल्लीभेटीत पालकमंत्रिपदाविषयीचा तोडगा निघाला.

कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी कोणत्या मंत्र्याकडे?
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार