
(nagpur)नागपूर – (Deputy Chief Minister Ajit Pawar)उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्रीपद यादी संदर्भात अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मोठे वक्तव्य केले आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही आमची मनातील इच्छा आहे आणि अजित पवार मुख्यमंत्री होणारही असल्याचे धर्मराव आत्राम यांनी सांगितले.गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री हे (Praful Patel)प्रफुल्ल पटेल यांचं आधीच ठरलं होतं. त्यांनी हा जिल्हा मागून घेतला आहे. पक्षासोबत महायुतीचं काम करायचे आहे.
औषधांच्या पुरवठा संदर्भात छेडले असता प्राधिकरणाच्या माध्यमातून औषधी खरेदी केली जाते. प्राधिकरणच्या माध्यमातून मेडिकल मेडिसिनची खरेदी आरोग्य विभागाच्या माध्यमातून केली जाते. ई टेंडर प्रक्रिया प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जाते. मेडिसिनचा तूटवडा नाही. मागील पाच-सहा दिवस सुट्टीचे दिवस होते खाजगी रुग्णालय सुद्धा मोठ्या प्रमाणात बंद होते, त्यामुळे अचानकपणे नांदेडमध्ये सरकारी रुग्णालयात रुग्णसंख्येचा फ्लो वाढला. यात कमी वजनाचे बाळ असल्याने ती घटना घडली आहे. भेसळी विरोधात मोहीम सुरू केलेली आहे. अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. सणासुदीचे दिवस असल्यामुळे या चार महिन्यात मोहीम राबवत असून त्यावर अंकुश लावण्यासाठी काम केले जाणार आहे. रेस्टॉरंट असो मिठाई असो प्रत्यक्ष त्या भागात जाऊन कारवाई केली जाणार आहे.

विदर्भात सुपारीचा हब आहे. आतापर्यंत 2 कोटी 24 लाखाची सुपारी जप्त केली आहे. चंद्रपूर, नागपुरातही कारवाई झालेली आहे.
अजित पवार नाराजी बाबत बोलताना अजित पवारांचा नाराजीचा प्रश्न नाही अगोदरच पालकमंत्री पदाबाबत बोलणं झालेलं होतं. पण त्याला उशीर झाला. चंद्रकांत पाटील नाराज नाहीत, पूर्वी त्यांच्याकडे एका जिल्ह्याची जबाबदारी होती. आता त्यांना दोन जिल्ह्याची जबाबदारी मिळाली आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. 2023 किंवा 2024 सुद्धा होऊ शकते. मात्र, मुख्यमंत्री अजित पवार होणार हे पक्के आहे. (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांना ते साथ देत आहेत. समझनेवाले को इशारा काफी है. अजित पवार मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीस बोलले त्यानंतर काही विषय नाही. आम्ही अनेक योजनांचे बाबतीत महाविकास आघाडीच्या काळात लावलेली स्थगिती उठवली आहे असेही (Dharmarao Baba Atram)धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.