
(Nanded)नांदेड-२४ तासांत २४ रुग्णांचे मृत्यू उघडकीस आल्यावर जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत पावलेल्या रुग्णांमध्ये १२ बालकांचा समावेश होता. (Patients Deaths Cases in Nanded)
हे प्रकरण तीन दिवसांपूर्वी उघडकीस आल्यावर काही लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाहणीत अधिष्ठात्यांचा चांगलाच समाचार घेण्यात आला होता. त्यांना शौचालयाची स्वच्छता देखील करायला लावण्यात आली होती. त्यामुळे अधिष्ठात्यांच्या तक्रारीनंतर खासदारांवर गुन्हा दाखल झाला होता. आता या प्रकरणात अधिष्ठात्यांसह बालरोग विभागातील डॉक्टारांवरही सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले आहे. यासंदर्भात अनेक मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रारी केल्या आहेत. यापैकी कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात या संबधित तक्रार दाखल केली आहे. त्यांचे नातेवाईक रुग्णालयात भरती असताना त्यांना बाहेरुन ४० हजारांहून अधिकची औषध खरेदी करण्यास सांगण्यात आले होते. इतकेच नाही रक्त व इतर तपासण्यांसाठी देखील पैसे खर्च करावे लागल्याची त्यांची तक्रार होती. 22 वर्षीय अंजली वाघमारे या महिलेची शनिवारी सायंकाळी प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला. मात्र, शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यांनतर, महिलेची देखील प्रकृती बिघडत गेली आणि तिचाही मृत्यू झाला. नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल दाखल झाल्यावर पोलिसांनी बुधवारी रात्री शासकीय (Hospital founder S. R. Wakode)रुग्णालयाचे अधिष्ठाता एस. आर. वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
