शालेय शिक्षण संघटनांचे 6 ऑक्‍टोबर रोजी धरणे आंदोलन

0

(Nagpur)नागपूर -राज्य शासन शालेय व उच्च शिक्षणात दररोज नवनवीन शासन निर्णय घेऊन शिक्षण क्षेत्रात अराजकता निर्माण करीत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवार, 6 ऑक्‍टोबर रोजी उपसंचालक, शालेय शिक्षण विभाग, धंतोली नागपूर येथे दुपारी 3 ते 5 वाजेदरम्‍यान सर्व संघटनाव्दारे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलनात सर्व शैक्षणिक विद्यार्थी, पालक संघटनांनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन महामंडळाचे सरकार्यवाह रविंद्र फडणवीस यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ व सर्व शैक्षणिक संस्थाव्दारे राज्‍यभरातील लोकप्रतिनिधींना त्‍यासंदर्भात निवेदन सादर केले आहेत. नागपुरात मंगळवारी विभागीय समन्वय समितीतर्फे महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणाविरोधात आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात ( MLA Mohan Mate)आमदार मोहन मते,  (MLA Praveen Datke)आमदार प्रवीण दटके, (MLA Tekchand Savarkar)आमदार टेकचंद सावरकर, (MLA Abhijit Vanjari)आमदार अभिजित वंजारी, (MLA Sunil Kedar)आमदार सुनील केदार व (Vikas Thackeray)विकास ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी शिक्षक आमदार नागो गाणार, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस, विभागीय कार्यवाह किशोर मासुरकरव राज्य कार्यकारिणी सदस्य आल्हादजी भांडारकर, म‍िल‍िंद बावसे‍ उपस्थित होते.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा