“..नंतर ते अफजलखानासारखी मिठी मारतात”: आमदार बच्चू कडू

0

(Hingoli)हिंगोली-भाजपा मित्र पक्ष म्हणून जवळ घेतो आणि नंतर अफजल खानासारखी मिठी मारतो. हे अजिबात चांगले नसून यामुळे पक्षाची प्रतीमा मलीन होते, याचे भान देखील त्यांनी ठेवले पाहिजे, असा टोला (MLA Bachu Kadu)आमदार बच्चू कडू यांनी भाजपला लगावला आहे.

आमदार कडू म्हणाले, (BJP)भाजपाकडून जाणीवपूर्वक खच्चीकरण करण्याचे काम केले जात आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी अचलपूर मतदारसंघात अनिल बोंडे यांना लक्ष घालण्यास सांगितले आहे. पण, बोलून कुणी लक्ष घालत नाही. एकीकडं सांगायचे सरकारमध्ये सामील व्हा. सामील झाल्यानंतर अशा प्रकारची भूमिका घ्यायची. हे कुणासाठीही चांगले नाही. ज्यांच्याबरोबर आहोत, त्यांच्याशी प्रामाणिक राहणे महत्वाचे आहे. यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होईल, असे ते म्हणाले.

(BJP state president Chandrasekhar Bawankule)भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र कडू यांच्या विधानावर बोलताना बच्चू कडू आमचे मित्र असल्याचे सांगितले. कडू हे महायुतीचे घटक असून, त्यांना कुठलाही त्रास नाही. बच्चू कडू स्वत:हा निवडून येण्यास सक्षम आहेत. पण, अधिक चांगल्या मताने निवडून येण्यासाठी आम्हीही त्यांच्याबरोबर आहोत, असेही बावनकुळे म्हणाले.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा