राष्ट्रवादी कोणाची?.. उद्या सुनावणी

0

(New Delhi)नवी दिल्ली–  (NCP)राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही महिन्यांपूर्वी फूट पडल्यावर आता खरी राष्ट्रवादी कोणाची, यावर उद्या शुक्रवारी निवडणूक आयोगापुढे युक्तिवाद होणार आहेत. दुपारी ३ वाजताच्या सुमारास आयोगापुढे युक्तिवाद सुरु होणार असून त्यात शरद पवार गटाच्या वतीने (Ad Abhishek Manu Singhvi)अॅड अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहेत.

राष्ट्रवादीच्या (Sharad Pawar)शरद पवार गटाकडून जवळपास आठ ते नऊ हजार शपथपत्र दाखल करण्यात आली आहेत. अजित पवार गटाच्या तुलनेने आम्ही दाखल केलेल्या शपथपत्रांची संख्या खूप जास्त असल्याचा दावा शरद पवार गटाकडून सुरु आहे. गुरुवारी शरद पवार यांच्यावतीने दिल्लीत विस्तारीत कार्यसमितीची एक बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत जर निवडणूक चिन्ह गोठवले गेल्यास आणि निर्णय विरोधात आल्यास पुढची रणनीती काय असेल यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा