
(Mumbai)मुंबई-२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी शरद पवार भाजपसोबत चर्चा करीत होते. त्यांच्या परवानगीनेच आमदारांनी सह्या केल्या होत्या. त्यावेळी (Sharad Pawar)शरद पवार हे तपास यंत्रणांना घाबरले होते का, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
आमदार तपास यंत्रणांना घाबरून भाजपसोबत गेल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांना सोडून त्यांचे आमदार का आले? याचा त्यांनी विचार करावा. आता त्यांच्यावर आरोप करण्यात काहीही अर्थ नाही. त्यांच्यावर तपास यंत्रणांना घाबरण्याचे आरोप करत असाल तर विधानसभा निवडणुकांनंतर २०१९ ला शरद पवार भाजपसोबत सरकार स्थापनेसाठी चर्चा करत होते. तेव्ह शरद पवार हे देखील तपास संस्थांना घाबरले होते का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

दरम्यान, सध्या (Eknath Shinde)एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असून तेच मुख्यमंत्री राहतील, असे सांगताना आगामी निवडणूक शिंदे यांच्या नेतृत्वातच लढविली जाणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.