गोरेगावमध्ये आगीत होरपळून ७ जणांचा मृत्यू

0

मुंबई : MUMBAI  मुंबईच्या गोरेगाव परिसरातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागून सात जणांचा होरपळून मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती असून अग्निशमन दल आणि पोलिसांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.  CM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगीत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी साठवून ठेवलेल्या भंगारामुळे ही आग लागली असावी, असा एक अंदाज आहे. मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून झाली आहे. तर जखमींच्या उपचारांचा खर्चही राज्य सरकार करणार आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा