
ANC – राज्य शासनाने सकारात्मक विचाराने दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे. संपूर्ण देशात सर्वप्रथम महाराष्ट्राने दिव्यांग मंत्रालय सुरू केले आहे. दिव्यांग मंत्रालय हा शासनाचा ऐतिहासिक निर्णय आहे. या माध्यमातून दिव्यांगांना सशक्त करण्यात येईल, अशी माहिती दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक बच्चू कडू दिली आहे. दिव्यांग कल्याण विभागातर्फे आयोजित ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियान आज सहकार विद्या मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात पार पडले. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड उपस्थित होते. दिव्यांगांच्या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले आहे. दिव्यांग नोंद घेण्यात येत नसल्यामुळे त्यांची नेमकी संख्या माहिती नव्हती. मात्र शासनाच्या पुढाकार घेतल्याने दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आले. मात्र येत्या काळात या विभागाला निधी देऊन सशक्त करणे गरजेचे आहे. या विभागाची आता सुरुवात झाली असून गेल्या काळात 82 शासन निर्णय घेण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे. विविध मदती आणि अनुदानाच्या राबविण्यात येत असल्यामुळे शासन आता दिव्यांगांच्या दारी पोहोचले आहे.
आरोग्यविषयक घटनांना घडवून आणतात त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे – संजय गायकवाड

– विजय भाऊ तुम्ही मविआमध्ये असताना मंत्री झाले तेव्हा किती आमदार खरेदी करायला पैसे दिले होते. हे जरा सांगा (विजय वडेट्टीवारांना टोला)
– दादांकडे मेजॉरिटी असल्याने त्यांच्या बाजूने निकाल लागेल
– प्रशासन भ्रष्ट झालंय हे सत्य आहे
– आरोग्यविषयक घटनांना घडवून आणतात त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे
– कमीत कमी एकनाथ शिंदे यांनी नक्षलग्रस्तांचं पालकत्व स्वीकारलं होतं. संजय राऊतांनी तर त्यांना झेड प्लस सेक्युरिटी नाकारली होती
– शिंदे साहेब यांच्यावर भारी पडलेले आहेत, त्यांनी रेकॉर्डब्रेक कामं केलेली आहेत