ओबीसी समाजाला भाजपने प्रतिनिधित्व दिले- आशिष देशमुख

0

 

गोंदिया- लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केले आहे. त्यामुळेच आज लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधवांची संख्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचा विकास हा भाजपच करू शकते, असे मत माजी आमदार भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी आशिष देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ओबीसींसाठी कोणतेही काम करीत नाहीत. सध्या ओबीसींचे एवढं आंदोलन सुरू असून कोणतेही आंदोलनामध्ये नाना पाटोले सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या जिल्ह्यातच ओबीसी समाज त्यांच्याविरुद्ध आहे, अशी टीका आशिष देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावर गोंदियात केली.
ओबीसी जनजागर यात्रा गोंदियात
गोंदिया शहरात आज भारतीय जनता पक्षाद्वारे ओबीसी जागर यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे नेतृत्व गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी केले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा