शरद पवार अचानक खर्गेंच्या घरी

0

नवी दिल्ली-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरील दाव्यांवर दोन गटांमध्ये सुनावणी सुरु होण्यापूर्वी शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी दिल्ली येथे भेट दिली. यावेळी काँगेस नेते खासदार राहुल गांधी, आमदार जितेंद्र आव्हाड, गुरुदीप सपाल उपस्थित होते. या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, इंडिया आघाडी आगामी काळात काय पावले उचलायची, यावर ही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
शरद पवार यांनी याविषयीची माहिती ट्विटरवर दिली आहे. या बैठकीत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर देखील चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही शिष्टाचार भेट होती, असा दावा पवारांकडून करण्यात आलाय. काही सूत्रांच्या मते पवार गटाचा राष्ट्रवादीवरील दावा नाकारला जाण्याची भीती शरद पवार यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी पुढील उपाययोजनांना सुरुवात केल्याचे मानले जात आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा