
नवी दिल्ली NEW DELHI : आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर पडली आहे. ९ ऑक्टोबरला प्रस्तावित असलेली ही सुनावणी आता ३ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे. (MLA Disqualification Case) सलग चौथ्यांदा आमदार अपात्रतेची सुनावणी लांबणीवर गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीसाठी निश्चित वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांपुढे यावरील सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावरील सुनावणी लांबणीवर पडते आहे suprim cort
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संभाव्य वेळापत्रकानुसार कागदपत्र तपासणी, त्याचबरोबर साक्ष नोंदवणे, उलट तपासणी मुद्द्यांचा समावेश असल्याने या आमदार अपात्र प्रक्रियेत तीन महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन असल्याने त्या दरम्यानच्या कालावधीत सुनावणी होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडून होणारा निर्णय जानेवारीतच येण्याची शक्यता दिसत आहे.
