दिव्यांग मेळाव्यात बच्चू कडू जिल्हा शल्यचिकित्सकांवर संतापले

0

 

बुलढाणा – राज्यात आरोग्य विभागाचे वाभाडे निघत असतानाच बुलढाण्यातील आरोग्य विभागाचा भ्रष्टाचारी कारभार समोर आला आहे. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सकांकडून पैशाची मागणी केली जात असल्याच्या दिव्यांगांकडून केलेल्या तक्रारीवरून दिव्यांग मेळाव्यात दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू जिल्हा शल्यचिकित्सकांवर संतापले आहे. यावेळी बच्चू कडू यांनी एक-एक वर्ष दिव्यांगाचे प्रमाणपत्र का करून देत नाही असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना विचारत असताना थेट माईक खाली करून जिल्हा शल्यचिकित्सकांना शिवीगाळ करून अंगावर हात उगारण्याचा प्रयत्न केला . यावेळी आ बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी यांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुभाष चव्हाण यांना 8 दिवसात निलंबित करण्याचे फोनद्वारे निर्देश दिले. आज बुलढाणा जिल्ह्यात दिव्यांग कल्याण विभाग,दिव्यांगाच्या दारी अभियान होते. या अभियानासाठी दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आले होते. अभियान कार्यक्रम संपल्यानंतर बच्चू कडू दिव्यांगाचे भेटी व तक्रारी घेत होते. यावेळी अनेक दिव्यांगांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण दिव्यांगाचे प्रमाणपत्र देत नाही आणि प्रमाणपत्रासाठी पैशाची मागणी करतात. पैसे नाही दिले तर दिव्यांग प्रमाणपत्र देत नाही अशी तक्रार होती.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा