शीतल भोसले ‘मिसेस इंडिया एलिट कॅलिफोर्निया’ ने सन्मानित

0

 

गोंदिया- युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे झालेल्या एका मिसेस इंडिया एलिट सोहळ्यात गोंदियाच्या मुलीने यश मिळवले आहे. गोंदियाच्या शीतल भोसले यांना ‘मिसेस इंडिया एलिट कॅलिफोर्निया’ चा ताज देत सन्मानित करण्यात आले आहे. माय ड्रीम टीव्ही यूएसए द्वारे या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये शितलने केवळ आपल्या सौंदर्यानेच नव्हे तर प्रतिभा, बुद्धिमत्ता आणि समर्पण भावाने सर्वांची मने जिंकली. शितलने इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये बीटेक केले असून गोंदिया येथील राजेंद्र डोये यांची मुलगी आहे. अमित भोसले यांच्याशी लग्न झाल्यानंतर शितल ह्या 2016 मध्ये युनायटेड किंग्डमला गेल्या होत्या. त्यानंतर पतीची बदली झाल्यामुळे त्या यूएसएला गेल्या. शितल या प्रसिद्ध चित्रकार, नृत्यांगना आणि फिटनेस तज्ञ देखील आहेत. त्यांनी ‘आयुष्यातील एका नवीन रोमांचक प्रवासाकडे हे पाऊल असून फिटनेस, फॅशन या दोन्हींचा समतोल राखणाऱ्या जीवनशैलीला प्रेरणेने प्रोत्साहन देण्यासाठी या व्यासपीठाचा लाभ घेतला असल्याचे सांगितले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा