
मुंबई-एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहावेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात नेतृत्व करावे, असा सल्ला शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे. आमदार शिरसाट म्हणाले की, मुख्यमंत्रीपदासाठी काही लोक बॅनर लावतात. यावर अजितदादांनी स्पष्ट केले व फडणवीस यांनीही स्पष्ट केले आहे. बॅनर लावण्यात काही गैर नाही. जे बॅनर लावतात त्यांना शुभेच्छा आहे. पण माझ्यासह आम्हा सर्व शिवसेना नेत्यांची इच्छा आहे की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
राऊत यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना शिरसाट यांनी राऊत यांनी घणाघाती नाही तर घाण टीका केल्याचे सांगितले. राऊत यांना खाली वाकून पाहण्याची सवय आहे. तुम्ही चोर आहात. तुमच्यावर कारवाई होणार म्हणून टीका करत आहात. मुख्यमंत्र्यांवर इतक्या खालच्या पातळीवर टीका करणारे आम्ही पाहिलेले नाहीत. राऊत यांनी फक्त नाडी आणि बेल्ट पाहिला. नाहीतर ते बाकीचेही सांगतील, असे शिरसाट म्हणाले. संजय राऊत ही राज्याला लागलेली किड आहे. जर तो आमच्या मुख्यमंत्र्यांना अशा भाषेत बोलत असेल तर त्याचा आम्हीही उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. सडेतोड उत्तर मिळेल, असा इशारा शिरसाट यांनी दिला.
