
खामगाव – शहरी भागाची वाढती हद्द व पोलिस कर्मचाऱ्यांची कमी असलेली संख्या, यामुळे गुन्हेगारी झपाट्याने वाढत आहे. चोरटे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकीकडे सायबर क्राईम करीत आहेत. तर दुसरीकडे नवीन व एकांतात असलेल्या वस्तींमधील बंद असलेल्या घरांवर पाळत ठेवून, त्या ठिकाणी चोरी करतात. तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील आदर्श कॉलनीतील बंद असलेल्या घरांना निशाना करून मध्यरात्री दरम्यान 4 ते 5 अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कमेसह लाखोंचे दागिने चोरले. ही घटना सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच एएसपी अशोक थोरात, ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी घटनास्थळी आले होते.खामगाव येथील शहरातील आदर्श नगर येथील संजीव रामराव पाटील नातेवाईकांकडे गेले होते, सकाळी ते परत आले. त्यावेळी त्यांना घराची कडी तुटलेला आढळून आला. घराची आतून पाहणी केली असता रोख-रक्कम व सोन्या- चांदीचे दागिने लंपास झाल्याचे आढळून आले. त्याचवेळी पाटील यांचे शेजारी विश्वास संपत बोराडे यांच्या घरात चोरट्यांनी मागील दरवाजा तोडून प्रवेश केला. त्यांच्या घरातील कपाटातून पाच हजार रक्कम लंपास केली. तर काही वेळाने त्याचं परिसरातील संदीप राऊत कुटुंबास बाहेर गावी गेले होते.त्याच्या घराचा कडी तोडून घरातील नगदी सह सोने- चांदीचे दागिने असा तिघांच्या घारातील 2 लाख 56 हजार 500 रू ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस सीसीटिव्हीद्वारे चोरट्याचा शोध घेत आहेत.