
(Nagpur)नागपूर -नौदलातील सेवा ते वृत्तपत्र छायाचित्रकार असा प्रदीर्घ प्रवास करताना, जुन्या काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार, रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक जयंतराव उपाख्य बाळासाहेब हरकरे ( Jayantrao Harkare)यांचे आज निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. उद्या दुपारी अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार केले जातील. निधनाचे वृत्त कळताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
नागपुरातील तरुण भारत दैनिकात त्यांनी सेवा केली. (Shri Poddareshwar Ram Temple)श्री पोद्दरेश्वर राम मंदिर शोभायात्रेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. अनेक आंदोलने त्यांनी आपल्या कॅमेराने टिपली. राम मंदिराच्या आंदोलनात सुद्धा ते सहभागी होते. छायाचित्रणाच्या जागतिक स्पर्धांमध्ये त्यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले होते. अनेक नवीन वृत्तपत्र छायाचित्रकार त्यांनी घडविले हे विशेष.
