
(Chennai)चेन्नई-भारताचा सलामीचा फलंदाज शुभमन गिल अफगाणिस्तानविरुद्धच्या विश्वचषकातील दुसऱ्या सामन्याला मुकणार आहे. (Shubman Gill to miss second match) शुभमन गिल अफगाणिस्तानविरुद्धच्या पुढील सामन्यासाठी संघासोबत दिल्लीला जाणार नसून तो सध्या तो वैद्यकीय पथकासोबत चेन्नईत राहणार आहे, असल्याचे बीसीसीआयने सांगितले. (ICC World Cup-2023) भारताचा विश्वचषकातील दुसरा सामना ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीत अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. अहमदाबादमध्ये १४ ऑक्टोबरला होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गिल खेळू शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
शुभमन गिलला डेग्यूचे निदान झाले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना देखील खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी इशान किशन हा सलामीला आला होता. पण त्याला खातेही उघडता आले नव्हते. पहिल्या सामन्यासाठी चेन्नईला पोहोचल्यानंतर शुभमनला खूप ताप आला होता. त्याच्या चाचण्या केल्या असता त्याला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. गिल यंदा जबरदस्त फॉर्मात असून तो २०२३ मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. यावर्षी 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ७२.३५ च्या सरासरीने आणि १०५ च्या स्ट्राइक रेटने 1,230 धावा केल्या आहेत. त्याच्या ६ वनडे शतकांपैकी ५ याच वर्षातील आहेत.

आता भारतीय संघाला त्याच्या रिकव्हरीची आशा आहे. अहमदाबाद येथे पाकिस्तानविरुद्ध होणारा सामना भारतासाठी सर्वात महत्वाचा असून त्यासाठी शुभमन फिट व्हावा, याचे प्रयत्न होणार आहेत.