
नागपूर, 9 ऑक्टोबर
लक्ष्मीनगर स्थित बालजगत मधील बालविकास सप्ताहात वक्तृत्व स्पर्धा व गीताई पाठांतर स्पर्धेत मैत्री परिवार संस्थेच्या उन्नतीगृहातील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली.
वकृत्व स्पर्धेत यश मोगरे आणि अमृत सहारे या दोघांनीही द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना सन्मानचिन्ह व पदक देऊन गौरविण्यात आले. यश मोगरे ला सुमतीताई सुकळीकर यांच्यावरील भाषणासाठी विशेष पारितोषिकही देण्यात आले. गीताई पाठांतर स्पर्धेत कृष्णा चाफले व प्रज्वल अगुवार यांनी उत्तम सादरीकरण केले. आदिवासी भागातून आलेल्या या विद्यार्थीनी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता, हे विशेष.

पारितोषिक वितरण (V.N. I.T. Dr. Pramod Padole, Director) व्ही.एन. आय. टी.चे संचालक डॉ. प्रमोद पडोळे,(Retired Judge. Mira Khadkar) निवृत्त न्या. मीरा खडक्कार, (Project Head Chaya Gade) प्रकल्प प्रमुख छाया गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या विद्यार्थ्यांना (Prof.Madhuri Yawalkar) प्रा. माधुरी यावलकर व प्रा. अनिल यावलकर यांचे मार्गदर्शन लाभले. मैत्री परिवार संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.