
: अनिल देशमुख (Anil Deshmukh)
(Mumbai)मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. ज्यांच्या जीवावर सत्तेची फळे चाखलीत, त्याच बापाला हुकूमशाह म्हणत असाल, तर थोडी तरी लाज बाळगा, अशी टीका अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh on Ajit Pawar Group) केली आहे. त्यांची हिंमत असेल स्वत:चा पक्ष काढून निवडणुका लढवून दाखवा, असे आव्हान देखील त्यांनी अजित पवार गटाला दिले आहे.
अनिल देशमुख यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये अनिल देशमुख यांनी नमूद केलेय की, “ज्या ८३ वर्षांच्या बापाने तुम्हाला मोठे केले, त्यांच्याच जीवावर तुम्ही सत्तेची फळ चाखली. स्वतःची संस्थाने उभी केलीत. आज त्याच बापाला तुम्ही हुकूमशहा म्हणत आहात. थोडी तरी लाज बाळगा. तुमच्यात हिम्मत असेलच तर स्वतःचा पक्ष काढा आणि निवडणुका लढवून बघा, जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल”, असेही देशमुख म्हणाले.
