काँग्रेस उद्या घेणार पूर्व विदर्भाचा आढावा

0

नागपूर NAGPUR  : लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेसकडून राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा सुरु आहे. यात नागपूर विभागातील सहा मतदारसंघाचा आढावा उद्या गुरुवारी नागपुरातील बैठकीत घेतला जाणार आहे. सकाळपासून ही आढावा बैठक होणार असून त्यात जिल्हानिहाय बैठकांचे सत्र होणार आहे. काँग्रेसने पूर्व विदर्भातील सर्व जागा लढवाव्या, असा सूर नेत्यांमध्ये ऐकायला मिळत आहे. (Congress Review Meeting for East Vidarbha)
पूर्व नागपुरातील MAHAKALKAR SABHAGRUH महाकाळकर सभागृहात जिल्हानिहाय ही बैठक होणार आहे. या बैठकीत मंडळ समित्या, बुथ प्रमुख, मतदार यादीची तपासणी तसेच मतदारसंघातील स्थिती याचा आढावा घेतला जाणार आहे. जिल्हानिहाय हा आढावा घेण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यास ठराविक कालावधी देण्यात आला आहे. नागपूर शहरानंतर वर्धा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर शहर व ग्रामीणच्या बैठका होणार आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सुनील केदार, सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, महिला अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्यासह प्रत्येक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, प्रभारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी व मंडळ अध्यक्षांसह सर्व बुथ प्रमुखांना बोलावण्यात आले आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा