
नागपूर -वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पारडी येथून निघालेली भाजप ओबीसी यात्रा आता शेवटच्या टप्प्यात असून वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथे यात्रेचे जंगी स्वागत झाले. या निमित्त भव्य रॅली व मेळावा आयोजित करण्यात आला. अमरावती, अकोला,शेगावमार्गे वाशिम पोहरादेवी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप होणार आहे. याप्रसंगी आमदार दादाराव केचे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते, सहसंपर्क प्रमुख रवींद्र चव्हाण, प्रदेश प्रभारी आशिष देशमुख, सौ अर्चनाताई डेहनकर – प्रदेश महामंत्री ओबीसी मोर्चा, सुमित वानखेडे वर्धा लोकसभा प्रमुख,सौ सारिका गाखरे – माजी जि प अध्यक्ष, चक्रधर डोंगरे – तालुका अध्यक्ष, सुरेश खवशी – जि प सदस्य, नितीन दर्यापुरकर, उपाध्यक्ष न. पंचायत, भगवान बुवाडे, सभापती नगर पंचायत, शिरीष भांगे, भाजपा जिल्हाध्यक्ष, किशोर भांगे, अध्यक्ष भाजपा, अशोकराव विजयकर, सौ रेवतीताई धोटे, दिलीप जसुटकर , निताताई गजाम, जि प सदस्या, सौ रजनीताई मानमोडे, महिला तालुका अध्यक्षा, सौ स्वातीताई भिलकर, नगराध्यक्ष न. प. कारंजा ,रवींद्र चव्हाण, रवि येनूरकर, प्रकाश बगमारे – ओबीसी मोर्चा महाराष्ट्र, सौ संगीता राऊत, आरमोरी, गडचिरोली व इतर पदाधिकारी उपस्थित होते. काटोल येथे सभा झाली तत्पूर्वी पारडसिंगा येथे सती अनुसया मातेचे दर्शन घेतले. भारसिंगी येथील मेळाव्यात ओबीसी समाजासाठी शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
ओबीसी समाजातील विविध घटकांशी जनसंपर्क करून त्यांना पंतप्रधान विश्वकर्मा योजनांबद्दल विधानसभा प्रमुख चरणसिंग ठाकूर, भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजयजी गाते व माजी महापौर सौ अर्चनाताई डेहनकर यांनी मार्गदर्शन केले.