samruddhi mahamarg accident समृद्धीवर अपघात, राजकारण नको – आमदार नितेश राणे

0

 

मुंबई MUMBAI  – आज पहाटे समृद्धी महामार्गावर जो दुर्देवी अपघात झाला ही अतिशय दु:खद घटना घडली. मात्र, त्या अपघातावर घाणेरडं राजकारण करण्याचे काम खा संजय राऊतांनी SANJAY RAUT  सुरु केले आहे.सरकार म्हणून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राज्यात विकासाची दालने खुली व्हावीत म्हणून हा महामार्ग तयार केला आहे. ज्या जनतेसाठी हा महामार्ग तयार करतोय, त्यावर अशा घटना व्हाव्यात अशी कोणाचीच इच्छा नसते. विशेष म्हणजे ज्या महामार्गाचे नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आहे, त्याला राऊत शाप कसे म्हणतात? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे  NITESH RANE यांनी उपस्थित केला आहे. samruddhi mahamarg accident
राऊत यांचा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता, त्यावेळी महामार्ग तयार करताना आमचा हिस्सा काय? असे विचारत होता. त्या कंत्राटदाराने तोंड उघडले, तर उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडणार नाहीत असा आरोपही राणे यांनी केला. कोस्टल रोड हा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मिरवत आहात.
त्यावर उद्या अपघात झाला तर त्यासाठी उद्धव ठाकरे यांना दोषी ठरवायचे आहे का? दरम्यान,मारू घाटकोपर संदर्भात छेडले असता
शिवसेनेने त्यावेळी गुजराती भाषेत पत्र लिहिले होते. तेव्हा तुम्हाला गुजराती चालत होते.आता गुजरातचे मुख्यमंत्री आल्यावर तुम्हाला चटके लागत आहेत.३० नोव्हेंबर २०२१ रोजी ममता बॅनर्जी मुंबईत आल्या होत्या, उद्योजकांची भेट त्यांनी घेतली. तेव्हा मुख्यमंत्री म्हणून तुमच्या मालकाने स्वागत केले होते.बंगालमध्ये हिंदूंना जिवंत जाळले जाते मग ज्या गुजरातमध्ये हिंदू सुरक्षित आहेत, गुजराती माणसाचे योगदान मुंबईत आहे.मग त्या गुजराती माणसांसाठी तुम्हाला चटके का लागतात, हिंदूंमध्ये फूट पाडणाऱ्या जिहादींकडून तुम्ही सुपारी घेतली आहे का?
हिंदूंवर अन्याय झाला, तर एका शब्दाने मुल्ला उद्धव बोलत नाहीत. मुंबई महापालिकेवर हिंदुत्वाचा झेंडा फडकवणार

ऑन समाजवादी ठाकरे भेट

– ज्या समाजवाद्यांच्या विरोधात बाळासाहेबांनी इतिहास घडवला

मराठी माणसाचा आवाज म्हणून शिवसेना मोठी झाली.आता कधी रजा अकादमी, तर कधी डीएमके व समाजवाद्यांच्या खांद्याला खांदा लावून उद्धव बसत आहेत.आता दाऊदला बोलवा आणि त्याला दिवाळीचे फराळ खायला घाला,असा टोला लगावला. जरांगे पाटील यांच्या इशाऱ्याबाबत छेडले असता,आम्ही त्यांची समजूत काढू, घटनेअंतर्गत त्यांना आरक्षण मिळवून देऊ,ओबीसी किंवा इतर आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ असा दावा केला.कधीकाळी मराठा मोर्चालामुका मोर्चा म्हणणाऱ्या राऊतांना बोलायचा अधिकार नाही.क्रिकेट हा जुगार वाटत असेल तर पुरावे द्यावेत.सर्वात मोठा जुगार खेळणारा वरूण सरदेसाई हा राऊत यांचा भाचा आहे. सचिन वाझे व वरुण सरदेसाई यांवर जुगाराचे व सेटिंगचे आरोप झाले आहेत.सर्वात मोठा जुगारी हा मातोश्रीवर बसला आहे असा आरोप आ राणे यांनी केला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा