अंबाबाई मंदिर नवरात्रौत्सव प्रारंभ

0

 

कोल्हापूर Kolhapur : आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला Sharadiya Navratri festival प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सकाळपासूनच अंबाबाई मंदिरात अंबाबाईच्या विधिवत धार्मिक विधीना सुरुवात झाली असून घटस्थापना देखील होत आहे. मंदिर परिसरात यानिमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

एकवीरा देवीच्या नवरात्र उत्सवाला प्रारंभ

धुळे- महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ खानदेश कुलस्वामिनी श्री एकवीरा देवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाला आज रविवारी सुरुवात झाली.पहाटे देवीची महापूजा आणि घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे धुळे शहरातील पांझरा नदीकिनारी असलेल्या श्री एकविरा देवी मंदिरात दरवर्षी अश्विन नवरात्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.सालाबादाप्रमाणे यंदाही एकवीरा देवी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार असून आज पहाटे पासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.पहाटे देवीला शेंदुरलेपन करून नारंगी रंगाचे महा वस्त्र परिधान करण्यात आले.नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात महाराष्ट्र सह मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून भाविक दर्शनासाठी गर्दी करीत असतात. 250 हुन अधिक कुळांची कुलदेवता म्हणून एकवीरा देवीची ओळख असून नवरात्र उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आल्याची माहिती सोमनाथ गुरव,एकवीरा देवी मंदिर विश्वस्त यांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा