
अमरावती AMRAWATI – विदर्भाचं कुलदैवत असलेल्या अमरावतीच्या अंबा देवी AMBA DEVI संस्थानमध्ये आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. पहाटे पासूनच दर्शनासाठी भविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे. आज सकाळी पहाटे 4 वाजता या ठिकाणी घटस्थापना झाली.विधिवत पूजन करण्यात आले. नऊ दिवस अंबादेवी संस्थान परिसरात नवरात्रौत्सवानिमित्त मोठी यात्रा भरते. विशेष म्हणजे पहाटे चार वाजल्यापासून शेकडो भाविक शहराच्या विविध भागातून अनवाणी पायी चालत देवीच्या दर्शनासाठी येत असतात.पहाटेपासूनच अमरावती शहर गजबजून जाते अशी माहिती राजेंद्र पांडे विश्वस्त, अंबादेवी संस्थान यांनी दिली.