
मुंबई : राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची वक्तव्ये महाराष्ट्राच्या समाजामध्ये फूट पाडणारी, आग लावणारी असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय अत्यंत संयमाने हाताळायला हवा. राज्याच्या एकतेला आग लावता येणार नाही’, असे राऊत म्हणाले. (MP Sanjay Raut on Maratha Reservation issue)
मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणाला विरोध केला असून त्यांनी मनोज जरांगे यांच्या भव्य सभांवरून प्रश्न उपस्थित केले. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मराठा समाज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे. आपण सर्व मराठा समाजाच्या मूकमोर्चामध्ये छाती पुढे काढून चालत होता. मग आता आपल्या हातात सत्ता आहे. अशावेळी तुम्ही वातावरण चिघळवण्याचे काम करत आहात? भुजबळ यांची वक्तव्ये समाजात फूट पाडणारी, आग लावणारी आहेत, असे राऊत म्हणाले.