शिंदे-फडणवीसांवर गुन्हे दाखल करा: विजय वडेट्टीवार

0

 

नागपूर : समृद्धी महामार्गावरील अपघातांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. समृद्धी मार्गावर रविवारी झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार
यांनी संताप व्यक्त केला. कुठल्याही सुविधा निर्माण केल्या नसताना केवळ दिखाऊपणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे घाईघाईने लोकार्पण करण्यात आले, त्यामुळे हे अपघात होत असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा