
मुंबई : समाजवादी पक्षाची युती करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आता पीएफआय, आयसीस, रझा अकादमी आणि एमआयएम सोबतही युती करावी, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलीय.डिसेंबर अधिवेशनाआधी विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता बदलेल, असा दावाही त्यांनी केला. (BJP MLA Nitesh Rane)
ठाकर गटाच्या मुखपत्रात समृद्धी महामार्गावर करण्यात आलेल्या टीकेवर बोलताना नितेश राणे यांनी गौप्यस्फोट केला. संजय राऊत यांनी आपल्या मालकाच्या भाच्याला विचारावे, समृद्धीवरील फूड प्लाझाचे काम मलाच हवे, यासाठीब्लॅकमेलिंग कोण करत होते, असा सवालही त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी समाजवादी विचार स्विकारलाच आहे आणि काल संजय राऊतांनी हिंदुत्वाच्या विचारांपेक्षा समाजवादी विचार हे जास्त प्रभावी असल्याचे सांगून टाकले आहे. मग उद्धव ठाकरेंनी आता पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी बोलावे, आयसीसशी बोलावे, रझा अकादमी आणि एमआयएमसोबतही बोलावे आणि त्यांच्यासोबतही युती करुन टाकावी, असा सल्लाही त्यांनी दिलाय.
