
नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर दिल्लीत सत्तेत आलेली आम आदमी पार्टी आता भ्रष्टाचारावरूनच गोत्यात आली आहे. ल्लीच्या कथीत अबकारी धोरण घोटाळ्यात आता आम आदमी पार्टीला च आरोपी बनविण्याचा ईडी आणि सीबीआयकडून सुरु असल्याची माहिती आहे. आपचे तीन नेते यापूर्वीच कारागृृहात पोहोचले आहेत. (Delhi Excise Policy Scam)
यासंदर्भात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी सर्वोच्च न्यायालयात माहिती दिली. या प्रकरमआत आपला आरोपी करण्याचा विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात आपला आरोपी का करण्यात आले नाही, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला होता. या प्रकरणात, आम आदमी पार्टीचे तीन प्रमुख नेते मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि संजय सिंह या तिघांना अटक करण्यात आली असून ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे जवळचे सहकारी आहेत. आपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय यांना विचारलं होतं की, ‘आप’ला प्रतिवादी का करण्यात आलेले नाही?