
नागपूर NAGPUR -नरखेड तालुक्यातील नवेगाव शिवारात Navegaon Shivarat in Narkhed taluka तालुका बिज गुणकेंद्राची जवळपास 50 एकर जागा गेल्या अनेक वर्षापासुन पडीत होती. तालुका बिज गुणन केंद्राचे 13 जून 2022 च्या शासन आदेशाने करण्यात आले होते. परंतु निधीअभावी येथील काम पुढे सरकले नाही. यासाठी पाठपुरावा करुन रोपवाटीकेसाठी 2 कोटी 56 लाख 940 रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रसचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख SALIL DESHMUKH यांनी दिली.
नरखेड परिसरात मोठया प्रमाणात संत्रा व मोसंबी लागवड करण्यात येते. या भागातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची रोपे मिळाली तर यातून शेतकऱ्यांचा फायदा होईल या दुष्टीकोनातून आमदार अनिल देशमुख यांचे प्रयत्न सुरु होते. सलील देशमुख यांनी पुढाकार घेवून जागेचा शोध सुरु केला. नरखेड शहराला लागुनच नवेगाव शिवारात कृषी विभागाच्याच तालुका बिज गुण केंद्राची 19.83 हेक्टर म्हणजे 50 एकर जागा गेल्या अनेक दिवसांपासुन पडीत असल्याची माहिती स्थानिकांनी सलील देशमुख यांनी दिली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना घेवून त्यांनी जागेची पाहणी केली. तसेच तालुका बिज केंद्राचे रोपवाटीकेत रुपांतर करण्यासाठी प्रस्ताव तयार करुन तो शासनास सादर केला. तत्कालीन कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे पाठपुरावा करुन रोपवाटीकेस मंजुरी सलील देशमुख यांनी घेतली होती.

रोपवाटीकेला मंजुरी जरी मिळाली असली तर निधी न मिळाल्याने पुढील कामाची गती मंद झाली होती. यासाठी सलील देशमुख यांनी अंदाजपत्रास प्रशासकीय मान्यता मिळण्यास मुंबई येथील मंत्रालयात अनेक बैठका घेतल्या. शेवटी अंदाजपत्रकास प्रशाकीय मंजुरी मिळाली असून रोपवाटीकेसाठी 2 कोटी 56 लाख 940 रुपये मंजुर करण्यात आले. लवकरच पुढील प्रशासकीय कामे पुर्ण करुन प्रत्यक्ष काम सुरुवात करुन ते चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी माझे प्रयत्न असणार असल्याचेही सलील देशमुख यांनी सांगितले.