33 वर्षाच्या संघर्षानंतर आई एकविरा देवीला मिळाले हक्काचे दागिने

0

 

धुळे DHULE – धुळ्यातील बहुचर्चित जिल्हा परिषद अपहार कांडातील आरोपी भास्कर वाघ BHASKAR WAGH यांच्या घरातून एकवीरा देवीचे दागिने जप्त करण्यात आले होते. धुळे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाने 33 वर्षानंतर या दागिन्यांचा लिलाव होऊन श्री एकविरा देवीवर रेणुका माता ट्रस्टने सर्वाधिक 16 लाख 51,000ची बोली लावत हे दागिने मिळविले. हे दागिने एकवीरा देवीच्या चरणी अर्पण करत आज तिसऱ्या माळेला हे दागिने श्री एकविरा देवीला अर्पण करण्यात आले.
धुळे जिल्हा परिषदेतील संपूर्ण राज्यात गाजलेल्या अपहार कांडातील आरोपी भास्कर वाघ यांच्या घरातून श्री एकविरा देवीचे दागिने 33 वर्षांपूर्वी जप्त करण्यात आले होते, त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून हे दागिने न्यायालयाच्या ताब्यात होते. अखेर या दागिन्यांचा लिलाव करून ते देवीला अर्पण करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अनेक भाविकांचे डोळे पाणावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा