सुधारित वेळापत्रकासाठी नार्वेकरांना शेवटची संधी : सुप्रीम कोर्ट

0

 

नवी दिल्ली NEW DELHI  : आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी सुधारित वेळापत्रक सादर न केल्याने त्यावर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड  Chief Justice D. Y. Chandrachud यांनी मंगळवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांना सुनावणीचे सुधारित वेळापत्रक सादर करण्याची शेवटची संधी दिली आहे. आता या प्रकरणी येत्या 30 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
आज वेळापत्रक सादर न केल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. यापूर्वीच्या वेळापत्रकावर आम्ही नाराज आहोत व आम्ही समाधानी नाही. विधानसभा अध्यक्षांना 30 ऑक्टोबरची शेवटची संधी असून त्या दिवशी तरी सुधारित वेळापत्रक घेऊन यावे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.
11 मे पासून अध्यक्षांनी काहीच केलेले नाही. विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागेल, अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली. दैनंदिन काम करता तर त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल, जर तुम्ही ठोस निर्णय घेत नसाल तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. याचिका निवडणूक आयोगासमोर नाही तर अध्याक्षांसमोर आहे. आतापर्यंत झलेले छोटे मोठे निर्णय सांगू नका. दसऱ्याच्या सुट्टीमध्ये अध्यक्षांसमोर बसून तुषार मेहता वेळापत्रक ठरवतील, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा