
जळगाव JALGAW – शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी जळगावात हजारोंच्या संख्येने आशा स्वयंसेविका Asha Volunteer आज रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. हजारोंच्या संख्येने आशा स्वयंसेविकांनी जळगाव जिल्हा परिषदेसमोर रास्ता रोको आंदोलन करून सरकारचा निषेध केला. जळगाव जिल्हा परिषदेसमोर रास्ता रोको आंदोलन करत हजारोंच्या संख्येने आशा स्वयंसेविकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनासह शासनाचा निषेध व्यक्त केला.
अनेक वर्षांपासूनच्या आमच्या मागण्या आहेत. त्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळावे. मागण्या मान्य झाल्या नाहीतर संपूर्ण राज्यभरात 70 हजारांहून अधिक आशा स्वयंसेविका तसेच गटप्रवर्तक या रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आल्याची माहिती रामकृष्ण पाटील, कार्यकारी उपाध्यक्ष, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना,कल्पना भोई, आशा स्वयंसेविका यांनी दिली