मला पळविण्यात आलं”, ड्रगमाफिया ललितचा खळबळजनक दावा

0

मुंबई : ड्रगमाफिया ललित पाटील याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. तो श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता, अशी माहिती मिळत असून त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी पकडले. (Drug Mafia Lalit Patil Arrested) दरम्यान, मी ससून हॉस्पिटलमधून पळून गेलो नाही, तर मला पळविण्यात आल्याचा गौप्यस्फोट ललिल पाटील याने केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील सस्पेंन्स वाढला असून लवकरच पोलिस याबाबत पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलिस ललित पाटीलला घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी जात असताना त्याने हा गौप्यस्फोट केला आहे. मला पळवण्यामागे कोणा-कोणाचा हात आहे, हे लवकरच सांगणार असल्याचे तो म्हणाला. ललित पाटील आणि त्याच्या साथीदाराला अंधेरी कोर्टात हजर केले जाणार आहे. विश्वसनीय माहितीनुसार ड्रगमाफिया ललित पाटील हा श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याला बंगळुरूमधून पळून जाताना अटक झाली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा