प्रशासकीय कामांचा शंभूराज देसाईंना विसर ? – सुषमा अंधारे

0

 

नागपूर – ड्रग्स माफिया ललित पाटील का पळून गेला? याचे उत्तर ना हॉस्पिटल प्रशासनाने दिले, ना सरकारने. स्वतः ललित पाटील यांनीच खुलासा केला आहे की, मला पळवले गेलंय. याला जबाबदार कोण? तो ससून मधून बाहेर पडल्यावर गाडीची मदत कोणी केली? पैशाची मदत कोणी केली? नाशिकहून गुजरात जाणे विचारून परत नाशिक येणे हा सगळा प्रवास सहज शक्य आहे. नाशिकमध्ये 300 कोटींचा कारखाना उभा कसा राहतो, पालकमंत्री म्हणून दादा भुसे यांची जबाबदारी आहे. दादा भुसे या गोष्टी माहीतच नाही असं ते म्हणत असतील तर ते फेल आहेत. माहिती असेल तर त्यांनी हे चालू कसे दिले?
संपूर्ण राज्यात एमडी सप्लाय होत असताना सोलापूरमध्येही असा कारखाना सापडला. येरवडा कोर्ट परिसरात चरस सापडलं, हे सहज शक्य कसे? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
शंभूराज देसाई यांना मंत्री म्हणून मुख्यमंत्र्याच्या आगल बगल फिरताना प्रशासकीय कामाचा विसर पडतोय का? ललित पाटील, भूषण पाटीलसह इतर चार आरोपी असून डीन संजय ठाकूर त्यांचे स्विय साहाय्यक ,उपचार करणारे डॉक्टर गुंतले आहेत. मुळात हरनीया रोगाच्या उपचारासाठी नऊ महिने लागतच नाहीत. ससूनसारखा हॉस्पिटलमधील वॉर्ड क्र 16 मध्ये मागील दीड वर्षापासून पंचतारांकित व्यवस्थेचा आनंद घेत होते. शेवटी हे सारे कोणाच्या आशीर्वादाने? याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले पाहिजे असेही सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा