एकनाथ खडसेंना १३७ कोटींच्या दंडाची नोटीस

0

(Mumbai)मुंबई-गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांना तब्बल १३७ कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांची सून आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनाही ही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. या नोटिशीमुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याची चर्चा सुरू आहे. ( Notice for Eknath Khadse )

जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमध्ये बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपयांचा गौण खनिज उत्खननाचा घोटाळा झाला असून त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. माझा आरोप खरा असल्याने एसआयटी स्थापन करून चौकशी करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून आता कारवाईला सुरुवात झाल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. अवैधरीत्या १ लाख १८ हजार ब्रास मुरूमाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी ही दंडाची कारवाई करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुक्ताईनगर तहसीलदारांनी एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि त्याशिवाय ६ शेतजमीन मालकांना १३७ कोटींवर दंडाची नोटीस बजावली आहे.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा