दुर्गा उत्सवानिमित्त महाकालचा आकर्षक देखावा

0

 

(Gondia)गोंदिया – गोंदिया जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात शारदीय नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे. जिल्ह्यामध्ये दुर्गा उत्सवाच्या माध्यमातून अनेक आकर्षक असे देखावे पहावयास मिळतात आणि हे देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. असाच एक आकर्षक महाकाल देखावा गोंदिया शहरातील सिंधी कॉलनी परिसरात तयार करण्यात आला आहे. शिव दुर्गा मंडळ द्वारा गेल्या 40 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दूर्गा उत्सव साजरा करण्यात येत आहे. यावर्षी कोयंबतूर येथील आदिनाथाच्या महाकालच्या मूर्तीची प्रतिकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेली आहे. या आदिनाथाच्या मूर्तीमधून प्रवेश देऊन आतमध्ये सुंदर असा बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा सादर करण्यात आला आहे. हा सुंदर देखावा पाहण्यासाठी शहरातील तसेच जिल्ह्यातील नागरिक आणि भाविक या ठिकाणी मोठी गर्दी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरवर्षी या मंडळाकडून विविध प्रकारचे देखावे सादर करण्यात येतात. यावर्षी आकर्षक असा बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा सादर करण्यात आला आहे

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा